पंजाबमध्ये होणार खांदेपालट ! अमरिंदर यांना राजीनाम्याचे आदेश

अमृतसर वृत्तसंस्था | पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना पक्षाच्या नेतृत्वाने राजीनामा देण्याचे निर्देश दिले असून यामुळे तेथील राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत.

पंजाब कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद वाढत चालला आहे. यात आता कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी पक्ष नेतृत्वाने केल्याची माहिती समोर आली आहे.  संध्याकाळी होणार्‍या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवीन नेत्याची निवड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत माहिती मिळताच अमरिंदर सिंग यांनी आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि खासदार मनीष तिवारी यांच्याशी चर्चा केली

र्व प्रयत्न करूनही अमरिंदर सिंग आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील राजकीय युद्ध संपू शकले नाही. शनिवारी होणार्‍या आमदारांच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी याबाबत सोनिया गांधीकडे भाष्य केलं आहे. अशा अपमानासह कॉंग्रेसमध्ये राहू शकत नाहीत, असे अमरिंदर सिंग यांनी म्हटल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता ते राजीनामा देण्यासोबत पक्ष देखील सोडण्याची शक्यता आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांचे समर्थक समजल्या जाणार्‍या आमदारांच्या एका गटाने अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंड पुकारले असून नव्या नेत्याची मागणी केली आहे. सुनील जाखड़, पंजाब कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष प्रताप सिंह बाजवा आणि बेअंत सिंह यांचे नातू आणि खासदार रवनीत सिंह बिट्टू अशी नावे पंजाबच्या संभाव्य नवीन मुख्यमंत्र्यासाठी लढत आहेत.

Protected Content