बुलढाणा । सर्वत्र वेब सेरीजची क्रेझ असतांना आता तालुक्यातील चिखली येथे वेब सेरीजचे चित्रीकरण सुरू झाले असून तेजस भंगाळे याचे दिग्दर्शन करत आहेत.
चिखली येथे वेब सेरीजचे चित्रीकरण सुरू झाले असून अलीकडेच याचे कॅमेरा पूजन करण्यात आले. पहिल्यांदा यातील गाण्याचे शुटींग करण्यात आले असून नंतर याच्या कथानकाचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती या वेब सेरीजचे दिग्दर्शन तेजस भंगाळे यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिली आहे.
कॅमेरा पूजन करतांना दिग्दर्शक तेजस भंगाळे यांच्यासह विनायक कोळी, सुवर्णा मेश्राम, मदन गायकवाड, प्रशांत जैवाळ, सारंग महाजन, शुभम सोरमारे, प्रविण कांबळे आदींची उपस्थिती होती. या वेब सेरीजनंतर आपल्या प्रॉडक्शनच्या माध्यमातून इतर प्रोजेक्टवर देखील काम करण्यात येणार असल्याची माहिती तेजस भंगाळे यांनी दिली आहे.