धक्कादायक : अत्याचारातून महिला तीन वेळा गर्भवती

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे या अत्यारातून महिला ही तीन राहिली. आयुर्वेदीक गोळ्या देवून गर्भपात केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरण फैजूपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावात ३२ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रावेर तालुक्यातील वडगाव येथे राहणारा रामचंद्र संघरत्न वाघोदे याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत २०१७ ते आतापर्यंत वेळोवेळी अत्याचार केला. गेल्या सहा वर्षापासून सुरू असलेल्या अत्याचारातून महिला ही तीन वेळा गर्भवती राहिली. तिनही वेळा तिचा गर्भपात करण्यासाठी आयुर्वेदीक गोळ्या देण्यात आल्या. हा प्रकार सहन न झाल्याने महिलेने अखेर फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी रामचंद्र संघरत्न वाघोदे याच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.जे.शेख करीत आहे.

Protected Content