अहमदाबाद (वृत्तसंस्था) एका अज्ञान व्यक्तीने भाषण करत असतांना हार्दीक पटेल यांच्या कानशिलात लगावल्यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे. गुजरातच्या सुरेंद्र नगरमधील प्रचारसभेदरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, हार्दीक पटेल हे गुजरातमधील काँग्रेस नेत्यांच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी सभा घेत आहेत.
हार्दिक पटेल आज सुरेंद्र नगर येथे सभा घेत असताना, स्टेजवरुन चढून एका मध्यमवयस्क व्यक्तीने हार्दीक पटेल यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर, संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अद्याप, त्या व्यक्तीची ओळख जाहीर करण्यात आली नाही. मात्र, ती व्यक्ती भाजपाशी संबंधित असल्याचा आरोप हार्दीक यांनी केला आहे. दरम्यान, हार्दीक पटेल सध्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ राज्यभर सभा घेत आहेत. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस उमेदवारास निवडणूक देण्याचे आवाहन ते मतदारांना करत आहेत.