फैजपूर ता. यावल । यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील १८ वर्षीय मुलीसह एक अल्पवयीन मुलगी या दोघांना दोन संशयितांनी फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही अद्याप फरार आहेत.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात राहणारी १८ वर्षीय मुलगी व तिच्या काकाची १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ह्या आपल्या कुटुंबियांसह राहतात. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता दोन्ही घरी एकट्या असतांना घरातून बेपत्ता झाल्या होत्या. मुलींच्या दोन्ही कुटुंबियांनी परिसरासह नातेवाईकांकडे शोधाशोध केली परंतू अद्याप आढळून आलेल्या नाही. अजय कमलाकर मोरे रा. यावल आणि मनोज सुपडू मोरे रा. हतनूर ता. भुसावळ यांनी दोन्ही मुलींना फूस लावून पळवून नेल्याचा संशय दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी केला आहे. मुलीच्या कुटुंबियांनी याबाबत दोन्ही संशयित आरोपींविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अजय कमलाकर मोरे रा. यावल आणि मनोज सुपडू मोरे रा. हतनूर ता. भुसावळ यांच्याविरोधात फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी २३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.जे.शेख हे करीत आहे. दोन्ही मुलींची अद्यापपर्यंत शोध लागलेला नसून संशयित आरोपींसह दोघी मुलींचा शोध घेत असल्याची माहिती फैजपूर पोलीस ठाण्यातचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांनी दिली आहे.