धक्कादायक: मारहाणीला कंटाळून तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेतले पेटवून: उपचारादरम्यान मृत्यू

अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नेहमीच्या मारहाणीला कंटाळून तरुणाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना २५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील शिरुड येथे घडली. आत्यहत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत प्रेत तहसील आवारातून हलविणार नाही, असा पावित्रा नातेवाईंकांनी घेतला होता. लअखेर चौघांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली आणि तब्बल तीन तासानंतर प्रेत तहसील आवारातून हलविण्यात आले.

विलास भाईदास घिसाडी (वय ३५) हे मयताचे नाव असून तो कुटुंबांसमवेत शिरुड गावी राहत होता. त्याच्या घराच्या मागील बाजूस रामबाई भुरा वडर, विनोद भुरा वडर, प्रविण भुरा वडर व सुदाम भुरा वडर हे राहतात. त्यांचे डुक्कर नेहमी मोकाट सोडल्यामुळे विलास घिसाडी यांच्या घरात येवून अन्न धान्याचे नुकसान नेहमी करीत असत. त्यांना विलास घिसाडी व त्यांचा भाऊ गणेश घिसाडी हे नेहमी समजावून सांगत की, तुम्ाच्या डुकरांमुळे आमचे नुकसान होते. असे सांगितल्याचा राग येऊन त्ो या दोघे भावांशी नेहमी वाद करत शिवाय विलास यास बऱ्याच वेळेस किरकोळ मारहाण केली आहे.

२५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास याच कारणाने रामबाई भुरा वडर, विनोद भुरा वडर, प्रविण भुरा वडर व सुदाम भुरा वडर यांनी विलास घिसाडी यास लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. अखेर या मारहाणीला व मानसिक त्रासाला कंटाळून विलासने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतले. नातेवाईकांनी तात्काळ धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना २६ रोजी पहाटे १२.३० च्या सुमारास विलासचे निधन झाले.

विलासचे निधन झाल्याचे समजताच नातेवाईकांनी धुळे येथे धाव घेत प्रेत अमळनेर तहसील कार्यालयाच्या आवारात दुपारी ३.४० वाजेच्या सुमारास आणले व प्रांताधिकारी आणि पोलिस निरीक्षकांना घेराव घातला. जोपर्यंत आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही प्रेत हलविण्ाार नाहीत, अशी मागणी केली. प्रांताधिकारी महादेव खेडकर आणि पोलिस निरिक्षक विकास देवरे यांनी नातेवाईकांची समजूत काढली व गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

अखेर गणेश भाईदास घिसाडी यांच्या फिर्यादीवरुन रामबाई भुरा वडर, विनोद भुरा वडर, प्रविण भुरा वडर व सुदाम भुरा वडर यांच्या विरुद्ध कलम ३०६ आणि २४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पैकी विनोद, प्रविण व सुदाम यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करत आहेत.

Protected Content