धक्कादायक ! पत्नीने पतीच्या प्रायवेट पार्टवर दिले सिगारेटचे चटके

बिजनौर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका पत्नीने आपल्या पतीला विवस्त्र करून त्याच्या प्रायवेट पार्टवर चटके दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पोलिसांना सांगितले की, 29 एप्रिल 2024 रोजी पत्नीने त्याला दुधाचा ग्लास दिला. त्यात नशेच्या गोळ्या होत्या.

दूध पिल्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्यानंतर पत्नीने त्याला विवस्त्र केलं. त्याचे हात-पाय बांधले व त्याच्या प्रायवेट पार्टला सिगारेटचे चटके देत होती. त्यानंतर तिने हातात चाकू घेऊन त्याला जखमी केलं. या दरम्यान पत्नी सिगारेट ओढत होती. त्यानंतर पतीने सांगितले की, लग्ना आधीपासून मी पत्नीला ओळखत होतो. आमच्यात बोलणं सुरु झालं, त्यानंतर प्रेम झालं. कुटुंबाच्या संमतीने १७ नोव्हेंबर २०२३ रोजी मुस्लिम पद्धतीने लग्न झालं. युवकाच्या वडिलांच म्हणण आहे की, पत्नीच्या मनात येतं, तेव्हा ती मारहाण करते. बेडरुममध्ये क्रूर वागणूक देते. हे सर्वांसमोर यावं म्हणून युवकाने बेडरुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. पतीची जबानी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा नोंदवलाय. आरोपी पत्नीला अटक केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.

Protected Content