अहिल्यादेवी नगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अहिल्यादेवी नगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्हयात धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हयातील वडगाव लांडगा या गावात एका व्यक्तीने दारूच्या नशेत आपल्या पत्नीसह दोन मुलींनाही जीवंत जाळल्याची मन हादरून टाकणारी घटना घडली आहे. पत्नीवर संशय घेऊन त्यांने पत्नी व आपल्या दोन्ही पोटच्या मुलींच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना जिवंत जाळलं. ही घटना सोमवारी २५ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता घडली. हे सर्व करूनही हे त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप दिसत होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनूसार, सुनील गोरख लांडगे असे आरोपीचे नाव आहे. त्यांच्या पत्नीचे नाव लीलाबाई सुनील लांडगे असे आहे, तर दोन्ही मुली अल्पवयीन असून एकीचे वय नऊ आणि दुसरीचे वय अवघे १४ महिने आहे. या घटनेमुळे परिसरात एकचा खळबळ उडाली. इतके करून ही आरोपी सुनील घरासमोरच्या झाडाखाली निवांत बसला होता. या घटनेमुळे संपूर्ण आहिल्यादेवी नगर जिल्हा हादरला आहे.