चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील दडपिंप्री गावात राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने जि.प.मराठी शाळेच्या आवारातील झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १८ मे रोजी सकाळी ११.३० वाजता उघडकीला आले आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता मेहुणबारे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अमोल सुरेश राठाडे वय १६ रा. दडपिंप्री ता. चाळीसगाव असे मयत मुलाचे नाव आहे.
अमोल राठोड हा मुलगा आपल्या कुटुंबासह दडपिंप्री गावात वास्तव्याला आहे. शनिवारी १८ मे रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असलेल्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. ही बाब परिसरातील काही तरूणांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने धाव घेवून त्याला खाली उतरवून तातडीने मेहुणबारे ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता मेहुणबारे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अशोक राठोड हे करीत आहे.