जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका लॉज व हॉटेलमध्ये अवैधरित्या वेश्या व्यवसाय सुरू असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या पथकाने रविवारी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास छापा टाकून पाच परप्रांतीय तरूणींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी हॉटेल व लॉज मालक दोन जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेल व लॉजमध्ये अवैधरित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनिय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला छापा टाकण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने रविवारी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास हॉटेल व लॉजवर टापा टाकला. यात पश्चिम बंगाल येथील पाच तरूणींची सुटका करण्यात आली. तसेच वेश्या व्यवसाय करण्यासाठी बाहेरील महिला व पुरूषांना भाडेतत्वावर रूम उपलब्ध करून देणाऱ्या संशयित आरोपी सागर नारायण सोनवणे आणि शाम विश्वास बोरसे दोघे रा. जळगाव यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यापुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे करीत आहे.