रावेर प्रतिनिधी । माणसातील इवल्याशा जिवाला मरणाच्या दाढेत ढकलून देणाऱ्या प्रसंगामुळे ममत्व कुठे हलपले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज शहरातील जुना सरकारी हॉस्पीटलमागे काटेरी झुडपात बेवारस स्थितीत पुरुष जातीचे बालक मिळून आले आहे. या नवजात चिमुरड्याला मरणाच्या दाढेत सोडून देणाऱ्या निर्दयी पालकांचा अद्याप शोध लागलेला नाही.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रावेर येथे गोकुळ करवले यांच्या फिर्यादीनुसार जुना सरकारी दवाखान्यामागे काटेरी झुडपात बेवारस स्थितीत पुरुष जातीचे बालक मिळून आले आहे. याप्रकरणी ३१७ आयपीसीनुसार गुन्हा दाखल करण्यात येत असून नमूद बालकास उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल जळगाव येथे पाठविण्यात आले आहे.
९ महिने स्वतःच्या उदरात या जिवाला वाढविणाऱ्या मातेला बाळाला जन्म दिल्यानंतरया तान्हुल्याला काटेरी झुडूपात सोडून देताना काहीच यातना झाल्या नसतील का ? असाच सवाल नागरिकांकडून विचारला जात असून अशा निर्दयी माता पित्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. आताच कलीयुगात आशा घटनेमुळे “माता ना वैरणी तु” अशी वक्ती त्या बाळाच्या घटनेतुन दिसत आहे.