Home क्राईम अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळल्याने खळबळ !

अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळल्याने खळबळ !


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील एका परिसरात अनोळखी अंदाजे ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी १५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता समोर आली. या संदर्भात दुपारी १२ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भुसावळ शहरातील मंगळवारी १५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता एका अंदाजे ६५ वर्षीय अनोळखी वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पंचनामा करून मृतदेह भुसावळ ट्रामा केअर सेंटर येथे रवाना करण्यात आला. मयताची ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू किंवा कागद मिळून आलेला नाही. दरम्यान महीताची ओळख पटवावी अशी आवाहन भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी केले आहे. या संदर्भात दुपारी १२ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगडे हे करीत आहे.


Protected Content

Play sound