जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दफनविधी करण्यात आलेला सात महिन्यांचा पुरुष जातीचा खराब गर्भ कबर खोदून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारीद्वारे केली आहे.
जळगाव शहरातील भिलपुरा परिसरातील रहिवासी करीम शेख ताज मोहम्मद यांनी या संदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या गर्भवती पत्नीचा सात महिन्यांच्या गर्भाची व्यवस्थित वाढ न होण्यासह तो खराब असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने तो काढण्यात आला. त्यानंतर हा गर्भ करीम मोहम्मद यांनी अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या कब्रस्तानमध्ये ३० डिसेंबर रोजी दफन केला. ३१ रोजी ते दफन केलेल्या ठिकाणी शांती प्रार्थना करण्यासाठी गेले असता तेथे खोदलेले आढळून आले व कबरमधील मृतदेह गायब असल्याचे लक्षात आले. याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी तक्रारीद्वारे केली आहे.