वडगाव टेक येथे सव्वा लाखांची चोरी ; गुन्हा दाखल

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील वडगाव टेक येथील शेतकऱ्याच्या घराच्या दरवाज्याला ड्रीलच्या साहाय्याने होल करुन १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वडगाव (टेक) ता. पाचोरा येथील रहिवाशी विजय दिलीप पाटील यांनी पाचोरा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार दि. ४ रोजी रात्री १२ : ३० ते ३ : ३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजुस असलेल्या लाकडी दरवाज्याला ग्रीलच्या साहाय्याने छिद्र करत घरात प्रवेश केला व घरात असलेली लोखंडी पत्री पेटी बाहेर नेवुन पेटीत ठेवलेले पत्नीचे २१ हजार रुपये किंमतीचे ७ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे दोन कानातील झुंबर, आईचे २१ हजार रुपये किंमतीचे ७ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याच्या कानातील रिंग, ४५ हजार रुपये किंमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचा अखंड गोल तुकडा, ५०० व १०० रुपयांच्या नोटा असलेले ४० हजार रुपये रोख तसेच घराजवळ बांधलेली ८ हजार रुपये किंमतीची शेळी असा एकुण १ लाख ३५ हजार रुपये किंमतीची चोरी करत घटनास्थळावरुन पोबारा केला. पहाटे घटनेबाबत विजय पाटील यांना कळताच त्यांनी पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला असुन घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे हे करीत आहे.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!