जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या गेट जवळून दुचाकीवर नेऊन तिला भुसावळ तालुक्यातील खेडी येथे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात १४ वर्षे अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. संशयित आरोपी हर्षल दीपक सोनवणे वय-२१ रा. भुसावळ याने पीडित मुलीला जळगाव शहरातील काशीबाई उखाजी विद्यालयाच्या गेट जवळून दुचाकीवर बसवून भुसावळ तालुक्यातील खेडी गावात नेले. त्याठिकाणी पिडीत मुलीवर अत्याचार केल्याची घटना १ जानेवारी रोजी उघडकीला आला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी हर्षल सोनवणे यांच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी संशयित आरोपी हर्षल सोनवणे याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे हे करीत आहे.