भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील लोण गावाजवळील रस्त्यावर एकएची कार आडवून काचा फोडून मानेला चॉपर लावून तरूणाच्या गळ्यातील ३० हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन हिसकावून चोरून नेल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. याबाबत भडगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सागर जगन्नाथ ठाकरे वय ३० रा. लोण ता. भडगाव हा तरूण रविवारी १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कारने घरी येत असतांना पवन रामचंद चव्हाण रा. अंजनविहिरे ता. भडगाव याने कारचा रस्ता आडविला. त्यानंतर कारच्या काच फोडून सागर ठाकरे याला मारहाण करून मानेला चॉपर लावून त्याच्याजवळून ३० हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन जबरी हिसकावून दुचाकीवरून पळून गेला. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात पवन चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार हिरालाल पाटील हे करीत आहे.