जळगाव प्रतिनिधी । शहरात आढळून आलेला कोरोनाचा रूग्ण मृत झाल्याने प्रचंड खळबळ उडाली असून यामुळे शहरवासियांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे दिसून आले आहे. हा उत्तर महाराष्ट्रातील कोरोनाचा पहिलाच बळी ठरला आहे.
याबाबत वृत्त असे की, काल रात्री शहरातील सालार नगर परिसरातील व्यक्ती कोरोनाचा पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले होते. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हा रूग्ण सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल झाला तेव्हाच त्याची प्रकृती अतिशय खालावली होती. कोरोना पॉझिटीव्ह झाल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. आज सकाळी त्याची प्रकृती अजून गंभीर बनल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. यानंतर दुपारी तीनच्या सुमारास त्याने शेवटचा श्वास घेतल्याचे वृत्त आहे.
हे देखील वाचा : निजामुद्दीन कनेक्शन फॅक्ट चेक : ‘त्या’ १३ जणांसोबत ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’चा संवाद !
कोरोनाचा पॉझिटीव्ह ठरलेला रूग्ण हा शहरातील सालार नगर या भागात वास्तव्यास होता. त्याचे जोशीपेठेत गोडावून होते. खरं तर दूरवर प्रवास केला नसतांनाही या रूग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. काल रात्रीच सालार नगराचा भाग सील करण्यात आला आहे. या भागात बाहेरच्या लोकांना बंदी घालण्यात आली आहे. संबंधीत रूग्णाच्या आप्तांची चाचणीदेखील करण्यात आली असून याचा रिपोर्ट नेमका काय येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, संबंधीत रूग्णाचा मृत्यू झाल्यानंतर सालार नगर भागात असणार्या त्यांच्या घराजवळ मोठी गर्दी झाली आहे. आज सायंकाळी अतिशय काळजी घेऊन त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हे देखील वाचा : कोरोनाच्या प्रतिकारासाठी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करा
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००