अहमदनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. आहे. ते शरद पवार गटाला जाणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र तशी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन अहमदनगर मतदारसंघातून उमेदवार असण्याचे हे स्पष्ट झाले आहे. अहमदनगर मतदारसंघातून भाजपचे उमेदवारी सुजय विखे पाटील हे आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून उमेदवार असतील हे मानले जात आहे.
आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर लंके म्हणाले की, मतदार संघातील सर्व मतदारांची मी माफी मागतो. त्यांनी मला पाच वर्षांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले होते. मात्र, लोकसभेला सामोरे जायचे असेल तर हा कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. चार महिने शिल्लक असतानाच हा कटू निर्णय मला घ्यावा लागत असल्याचे म्हणत नीलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ‘कम से कम दोन लाख’ आपण दोन लाख मतांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवणार आहे. आमदार नीलेश लंके हे आता अहमदनगर मधून शरद पवार गटाचे उमेदवार असतील त्यामुळे हा अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.