पाचोऱ्यात ९ ऑगस्ट रोजी ‘शिवस्वराज्य यात्रा’ येणार : माजी आ. दिलीप वाघ

amol kolhe and bhosle

 

पाचोरा (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रव्यापी ‘शिवस्वराज्य’ यात्रा काढत आहे. लोकप्रिय अभिनेते व राष्ट्रवादीचे शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे या यात्रेचं नेतृत्व करणार असून साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यात्रेचे स्टार प्रचारक असणार आहेत. ही यात्रा ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी समर्थ लॉन्स पारोळा रोडवर येणार आहे. एका पत्रकार परिषदेत माजी आमदार दिलीप वाघ यांनी याबाबत माहिती दिली.

 

सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या कथित फोडाफोडीच्या व खच्चीकरणाच्या राजकारणाला जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रव्यापी ‘शिवस्वराज्य’ यात्रा काढत आहे. लोकप्रिय अभिनेते व राष्ट्रवादीचे शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे या यात्रेचं नेतृत्व करणार असून साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यात्रेचे स्टार प्रचारक असणार आहेत. ही यात्रा ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वा समर्थ लॉन्स पारोळा रोडवर येणार आहे.

 

‘शिवस्वराज्य’ यात्रा माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पाचोरा भडगाव मतदारसंघात येत आहे. या यात्रेत राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार, धनंजय मुंडेंसह राज्यातील व जळगाव जिल्यातील नामवंत नेते यांची उपस्थि असणार आहे. तरी पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकरी, व्यापारी, वकील, डॉक्टर असोसिएशन सामाजिक संघटना संस्था तरुण यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन माजी आमदार दिलीप वाघ यांनी त्याच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलताना केले. यावेळी पालिका गटनेते संजय वाघ, नगरसेवक भूषण वाघ, विकास पाटील, वासुदेव महाजन, अशोक मोरे, खलील देशमुख, बंटी महाजन, शाम पाटील, गोपी पाटील, योगेश कुमावत, मनीष बाविस्कर, सुदाम पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content