सुषमा स्वराजांच्या पार्थिवाचे राष्ट्रपती, पंतप्रधानांनी घेतले अंतिम दर्शन

sushama swaraj

 

मुंबई (प्रतिनिधी) माजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे राष्ट्रपती रामनाखथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगगुरू बाबा रामदेव आणि अनेक बड्या प्रस्थांनी दर्शन घेतले आहे. दरम्यान, आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

 

मोदी सरकारच्या पहिल्या कार्य़काळात केंद्रात परराष्ट्र मंत्रालयाची धुरा सांभाळणाऱ्या आणि राजकीय पटलावर अत्यंत प्रभावी अशी कामगिरी करणाऱ्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3 वाजता लोदी रोडच्या विद्यूत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. आज सकाळी सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तर दुपारी 12 ते 3 पर्यंत भाजपच्या केंद्रीय कार्यालयात त्यांचे पार्थिव ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता लोदी रोडच्या विद्यूत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Protected Content