चौगाव येथील बंधार्‍याचे जलपूजन

chopda taluka jalpujan

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील चौगाव येथे जलयुक्त शिवार अभियानाच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या बंधार्‍यातील पाण्याचे पूजन करण्यात आले.

आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पुढाकाराने चौगांव येथे जलयुक्त शिवार अभियान अंतरर्गत माती बांध व सिमेंट बंधार्‍यांचे काम झाले असून सध्या सुरू असणार्‍या पावसाने यात मोठा जलसाठा झाला आहे. यामुळे चौगांव शिवारातील परिसरात पाण्याची पातळी वाडण्यास मदत होत असल्याने परिसरात आनंद व्यक्त होत आहे. दरम्यान, या बंधार्‍याचे जलपूजन सरपंच सौ.सुरेखाबाई संजय धनगर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी तालुका शिवसेना संघटक सुकलाल कोळी, विस्तार अधिकारी सतीश बाविस्कर, पोलिसपाटील गोरख पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग धनगर, मनोहर पाटील, गजानन महाराज(माऊली), वनसमिती सचिव विश्राम तेले, माजी सरपंच आधार आण्णा, उमरसिंग नाना, रविंद्र पाटील, नितिन धनगर, रोहीदास कोळी, सुनिल राजपुत. भरत पाटील, विशाल कोळी, संदिप कोळी, रविंद्र कोळी, बापु धनगर, सुरेश धनगर भगवान भिल, संजय धनगर, केशव भिल, प्रकाश पारधी, गोकुळ पाटील, गोपाल पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content