नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना कुणाची ? यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.
उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेतील मालकीबाबत न्यायालयीन लढाई सुरू आहे. यातील सर्व याचिकांवर पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाची सुनावणी घेण्यात येणार असल्याचे अलीकडेच जाहीर करण्यात आले होते. यानंतर या संदर्भात आज अर्थात २५ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचेही कोर्टाने नमूद केले होते.
दरम्यान, सरन्यायाधिश एन. रामण्णा हे उद्या म्हणजेच २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. यामुळे ते आज याबाबत काही तरी निर्णय देतील अशी शक्यता होती. तथापि, आज याबाबतची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. ही सुनावणी आता सोमवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. म्हणजेच यावरील सुनावणी ही होऊ घातलेले सरन्यायाधिश लळीत यांच्यासमोर होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.