मुंबई प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून हॉटेल रिट्रीमध्ये असणार्या शिवसेना आमदारांना आता मतदारसंघात परतण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून सत्ता स्थापनेची कोंडी सुरू असल्यामुळे शिवसेनेने आपल्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. भाजपकडून फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता गृहीत धरून ही सावधगिरी बाळगण्यात आली होती. या सर्व आमदारांना हॉटेल रिट्रीट येथे ठेवण्यात आले होते. येथेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे आदींसह अन्य नेत्यांनी वारंवार आमदारांसोबत बैठक घेतली. आज सायंकाळी या आमदारांना पक्षातर्फे मतदारसंघात परतण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत मतदारसंघात राहण्याचे निर्देश या आमदारांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.