शिवसेना पक्ष संघटन मजबूत करा-सुनिल पाटील

shivsena meeting pachora

पाचोरा प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर, पुन्हा भगवा फडकावण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन क्षेत्रप्रमुख सुनील पाटील यांनी केले. ते मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.

याबाबत वृत्त असे की, शिवतीर्थ शिवसेना कार्यालय येथे पाचोरा-भडगाव तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. याप्रसंगी प्रास्ताविक अँड दिनकर देवरे यांनी केले. तर अध्यक्षीय भाषणात सुनील पाटील यांनी सांगितले की आपण बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक असून सर्वांच्या सहकार्याने भगवा महाराष्ट्रात डौलत आहे. लवकरच राज्याची विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याकरिता शिवसेना पक्ष संघटना मजबूत उभारणीसाठी आपण आपल्या गावपातळीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशाने पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेना ,युवासेना, महिला आघाडी , पुरुष सदस्य नोंदणी पूर्ण करायची आहे. माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र या कार्यक्रमांअतर्गत गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक यावर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. तसेच गावाच्या दर्शनीय भागावर बोर्ड लावा, शालेय महाविद्यालयीन मुले-मुली ,शेतकरी ,व्यापारी मजूर, यांच्या समस्या दूर करा,आपल्या मतदारसंघात झालेली विकास कामे नागरिकांपर्यंत पोहोचावा. विकास कामांची व शिवसेनेच्या कार्यक्रमाची प्रसिद्धी सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, व्हाट्सअप, फेसबुक यावर प्रसिद्ध करा असे सुनील पाटील यांनी आवाहन केले.

या बैठकीला दिनकर देवरे, गणेश पाटील, किशोर बारावकर, बंडू चौधरी, शरद पाटील, डॉ भरत पाटील ,जि प सदस्य पदमसिंग पाटील, अविनाश कुडे, उपनगराध्यक्ष शरद पाटे , हिरालाल पाटील ,विनोद पाटील ,दिनकर चित्ते, भगवान राठोड, गोपाल परदेशी, राजेंद्र गीते, भरत खंडेलवाल, पपु राजपूत, मल्हारी पाटील ,संदीप पाटील अनिकेत सूर्यवंशी ,वैभव राजपूत, अण्णा चौधरी, बाप्पू हटकर दिगंबर माळी, नाना वाघ, ज्ञानेश्‍वर पाटील, परशुराम पाटील अरुण मिस्तरी ,मुकेश चौधरी, बाजीराव गीते ,शांताराम वाघ, अमरसिंग परदेसी, शंभो परदेशी , स्विय सहायक राजेश पाटील, नितिन पाटील, विजय भोई,उपजिल्हा संघटिका सुनीता ताई पाटील, मंदा पाटील ,सुनंदाताई महाजन, किरणताई पाटील, उर्मिला शेळके, रत्नाबाई पाटील,बेबाबाई पाटील ,सुषमा पाटील ,पद्माताई पाटील ,आरती शर्मा शितल पाटील, सुनिता पाटील ,स्मिता पाटील, अर्चना मिश्रा ,विजया खैरे ,सुनंदा पाटील ,जया वाडेकर, गीता मोरे, प्रीती सोनवणे ,करुणा चेडे ,वर्षा खैरनार, लताबाई वाघ, अनिता निंबाळकर, आशाबाई हटकर, मिनाबाई तुपे ,संगीता चौधरी, कल्पनाबाई पाटील नर्मदाबाई मराठे, यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content