जळगावात शिवसेनेतर्फे शेतकऱ्यांसाठी पिक विमा मदत केंद्र सुरु

33c5df4f 22f7 4a45 b3ec fd91cbf68eba

जळगाव (प्रतिनिधी) तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख राजेन्द्र चव्हाण यांच्या खोटे नगरातील संपर्क कार्यालयात पिक विमा मदत केंद्राचे उद्घाटन जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांच्या हस्ते नुकतेच  करण्यात आले. या केंद्रामार्फ़त शेतकऱ्यांना पिक विम्यासंदर्भात असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी मदत व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

गेल्या वर्षी पिक विम्यास पात्र असतांनाही विमा कंपन्यांनी अनेक शेतकऱ्यांना अपात्र ठरवून मदतीपासुन वंचित ठेवले होते. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गांभीर्यपूर्वक दखल घेऊन पात्र वंचित शेतकऱ्यांना पिक विमा मिळवुन देण्यासाठी राज्यभर शिवसेनेतर्फे पिक विमा मदत केंद्र मार्फ़त फॉर्म गोळा करणे सुरु केले आहे. या पिक विमा मदत केंद्रात वंचित शेतकऱ्यांची माहिती भरून शेतकऱ्यांचे अर्ज शिवसेना पदाधिकाऱ्यांमार्फ़त भरून घेतले जात आहेत. राज्यभरातून सगळया तालुक्यातील जमा केलेले अर्ज मुंबई येथे जमा करुन त्या-त्या शेतकऱ्यांना मदत मिळवुन देण्यात येणार आहे.

जळगाव येथील मदत केंद्राचे उद्घाटन प्रसंगी उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, जेष्ठ कार्यकर्ते संजय घुगे, फुपनीचे सरपंच डॉ. कमलाकर पाटील, सुरेश गोलांडे, युवा सेनेचे उपतालुका प्रमुख गजानन जगदाळे, अमृत पाटील, सुधाकर पाटील, दगडू पाटील, आत्माराम महाजन, नथु पाटील, अरुण पाटील यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content