एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी

मुंबई वृत्तसंस्था– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेते पदावरून अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे या माध्यमातून आता शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष अजून विकोपाला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेचे गटनेते तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षात उभी फूट पाडून 39 आमदारांना आपल्या सोबत घेतले. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला असून यानंतरच्या नाट्यमय घटनेनंतर एकनाथ शिंदे हे कालच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असून भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे दरम्यान गेल्या दोन-तीन दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची शिवसेनेतील पदांवरून हकालपट्टी करण्यात येईल असे मानले जात होते आतापर्यंत तरी तसे करण्यात आले नाही तथापि आज रात्री शिवसेनेतर्फे अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांना त्यांच्या नेते पदावरून हटवण्यात आलेले आहे

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या क्षणापर्यंत आपण शिवसेनेतच असून आपल्या सोबत शिवसेना असल्याचा दावा केलेला आहे या पार्श्वभूमीवर त्यांची आज पक्षाने नेते पदावरून केलेली हकालपट्टी ही लक्षणीय मानली जात आहे तर यामुळे शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष आता विकोपाला जाण्याची चिन्ह देखील दिसून येत आहेत

Protected Content