मुंबई प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीत सलग दोन पराभव होऊनही ‘आम्हीच देशाचे राज्यकर्ते’ या ‘मोगली’ मानसिकतेतून काँग्रेस बाहेर पडण्यास तयार नसल्याची जोरदार टीका शिवसेनेने केली असून पक्षाध्यक्ष निवडणीतील घोळाबाबत जोरदार टोलेबाजी केली आहे.
काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी नुकतीच सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे. या प्रकरणी आज शिवसेनेचे मुखपत्र असणार्या सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. या अग्रलेखात म्हटले आहे की, अडीच महिने काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचे अध्यक्षपद रिकामे होते. अखेर दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याच गळ्यात पुन्हा एकदा हंगामी अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली. काँग्रेसच्या याच निर्णयावर शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आतापर्यंत ज्या नावांवर चर्चा झाली ती नावे म्हणजे रोगापेक्षा औषध भयंकर अशी अवस्था आहे.
या अगलेखात पुढे म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीत दुसर्यांदा पराभव होऊनही ‘आम्ही देशाचे राज्यकर्ते’ या ‘मोगली’ मानसिकतेतून काँग्रेस पक्ष बाहेर पडायला तयार नाही. देशात कलम ३७० हटवल्याचे स्वागत संपूर्ण देशात स्वागत होत असताना काँग्रेस ‘३७०’ची जळमटं आपल्या अंगावरून दूर करायला तयार नाही. त्यामुळे काँग्रेसचा दिल्लीच्या गल्लीतील मीना बाजार झाला आहे. त्या ठिकाणी जुनीच गिर्हाईके वावरताना दिसतात. तसेच काँग्रेसच्या र्हासाला मोदी शाह जबाबदार नाही. सोनिया गांधी यांच्या खांद्यावर भार टाकून काँग्रेसने उरलेले सत्वही गमावले असल्याची टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.