मुंबई प्रतिनिधी । दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांचे स्मारक असणार्या शिवतीर्थावर आज सकाळपासून जनसागर उसळला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज, रविवारी शिवाजी पार्क येथे त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक दाखल झाले आहेत. लवकरच राज्यात शिवसेना सत्ता स्थापन करण्याची शक्यता असल्याने या वर्षीच्या स्मृती दिनाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. आजच्या दिवशी शिवसेनेचे तमाम नेते शिवतीर्थावर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देणार आहेत. तसेच, राज्यभरात स्मृतीदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, आजवर महायुती असल्याने भाजपचे नेते शिवतीर्थावर हजेरी लावत असत. मात्र यावर्षी महायुती तुटल्याने भाजपचे नेते येथे येणार का ? आणि महाआघाडीचे नेते येथे हजेरी लावणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.