पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक (किल्ले रायगड) दिनानिमित्त शिवसेना, युवासेना, महिला आघाडीतर्फे पाचोरा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शहरातील राजे संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ अॅक्लेरीक डिजीटल नावाच्या फलकाचे अनावरण आ. किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच शहरातील खंडेराव नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विधिवत दुग्धाभिषेक आ. किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच याठिकाणी शिवव्याख्याते शिवशाहीर शिवाजीराव पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण शहर ढोलताशांच्या गजराने व फटाक्यांच्या आतिषबाजीने दणाणले होते.
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील १३ नगरपालिकांपैकी जवळपास ११ नगरपालिकांना ५ हजार लिटर क्षमतेचे फायर फायटर दिले आहेत. पाचोरा नगरपालिकेला सुद्धा एक फायर फायटर देण्यात आले असुन त्या फायर फायटर वाहनाचा देखील उद्घाटन आ. किशोर पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी आमदार किशोर पाटील, न. प. मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर, उपमुख्याधिकारी डी. एस. मराठे, मा. नगराध्यक्ष संजय गोहील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, न. पा. प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, शहर प्रमुख किशोर बारावकर, युवानेते सुमित किशोर पाटील, नगरसेवक सतिष चेडे, बंडु चौधरी, बापु हटकर, उपजिल्हाप्रमुख प्रा. गणेश पाटील, प्रविण ब्राह्मणे, भरत खंडेलवाल, भुषण पेंढारकर, राहुल पाटील, सागर पाटील, वैभव राजपुत सह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अल्पसंख्याक आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.