आता काँग्रेस नेते शिवकुमार ईडीच्या रडारवर

बंगळुरू वृत्तसंस्था । कर्नाटकातील काँग्रेसचे मातब्बर नेते डी. के. शिवकुमार यांना आता सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने नोटीस बजावली असून त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

डी.के. शिवकुमार यांना कर्नाटक काँग्रेसमधील संकटमोचक नेते म्हणून समजले जाते. विशेष करून अलीकडच्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांना राष्ट्रीय पातळीवर व्यापक प्रसिध्दी मिळालेली आहे. या पार्श्‍वभूमिवर, त्यांची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. खरं तर २०१७ साली त्यांच्या निवासस्थानांसह कार्यालयांवर प्राप्तीकर खात्याने धाडी टाकल्या होत्या. यानंतर २०१८ मध्ये त्यांना ईडीने नोटीस बजावली होती. ही नोटीस रद्द करण्यासाठी शिवकुमार यांनी न्यायालयात धाव घेतली होती. तथापि, तेथेही दिलासा न मिळाल्याने आता त्यांची ईडीतर्फे चौकशी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या अनुषंगाने त्यांना ईडीने नोटीस बजावली असून त्यांचे चौकशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content