पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश करणार आहेत. हे आता निश्चित झाले आहे. येत्या २६ मार्च रोजी ते आपल्या शेकडो समर्थकासंह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. शिरूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्याविरोधात ते महायुतीचे उमेदवार असतील.
महायुतीच्या जागावाटपात शिरूर मतदारसंघाची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घडयाळ या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढणार आहे. पक्षप्रवेशाआधी त्यांचा शिंदे गटाचे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालं आहे असे ते म्हणाले. आज संध्याकाळी महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होईल, नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाच पंतप्रधान बनवायच. 45 पेक्षा जास्त खासदार निवडणूक आणण्याच आमच उद्दिष्टय आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सूनील तटकरे म्हणाले. शिवाजी आढळराव पाटील याआधीही २०१४-१९ दरम्यान शिरूर मतदारसंघाचे शिवसेनेकडून खासदार होते.