Home मनोरंजन शिव ठाकरे ठरला बिग बॉसचा विजेता

शिव ठाकरे ठरला बिग बॉसचा विजेता

0
109


shiv thakre big boss

मुंबई प्रतिनिधी । मूळचा अमरावतीकर असणारा शिव ठाकरे हा मराठी बिग बॉसच्या दुसर्‍या सिझनचा विजेता ठरला आहे.

रविवारी संध्याकाळी बिग बॉसची महाअंतिम फेरी सुरू झाली. यात नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, शिव ठाकरे, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर व वीणा जगताप हे सहा स्पर्धक पोहोचले होते. तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नेहा व शिव हे दोघंच बिग बॉसच्या घरात राहिले होते. अखेर शिवने बाजी मारली. शिवला १७ लाख रुपयांचे पारितोषीक मिळाले. शिव ठाकरे हा मूळचा अमरावतीचा राहणारा असून रोडीज शो या माध्यमातून तो लोकप्रिय झालेला आहे.


Protected Content

Play sound