भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात तब्बल १५ दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात आहे. तो ही गाळ मिश्रीत पाणीपुरवठा होत आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भुसावळ नगरपालिकासमोर ठिय्या आंदोलन करत विविध मागण्यांचे निवेदन नगरपरिषद प्रशासनाला दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भुसावळ शहर हे दोन लाख वस्तीचे शहर आहे. येथील नागरिकांना खालील प्रमाणे मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
१) शहरात अमृत योजना ही उत्तम प्रकारे पाणी पुरवठा करणारी चांगली योजना आहे. गेल्या ७ वर्षापासून ह्या योजनेचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे ती लवकर सुरू करावी.
२) नगरपालिकेने ५ कोटी खर्च करून स्वच्छ पाणी पुरवठा करन्यासाठी ठेका संबंधित ठेकेदाराला दिला परंतु अद्याप पर्यंत भुसावळ शहरातील नागरिकांना स्वच्छ व वेळेवर पाणी मिळत नाही आहे .
३) शहरात लाखो, करोडो रुपयांची कामे जाहीर होतात. यामध्ये रस्ते, गटारी, सुशोभीकरण. पण कामांचा दर्जा निकृष्ट आहे. या अशा अपूर्ण, निकृष्ट कामांची चौकशी करावी. आणि अशा ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करावी. यातील उत्तम उदाहरण म्हणजे भुसावळ हायस्कूल समोरील रोड हा रोड ६ महिन्यामध्ये खराब झालेले आहे तो रस्ता तत्काळ संबंधित ठेकेदाराकडून करून घ्याव
३) भुसावळ शहरात काही भागात दिवसा लाईट सुरू असतात आणि काही भागात रात्री बंद असतात. जळगाव रोड वरील संपूर्ण स्टेट लाईट अनेक महिन्यांपासून बंद आहे ती तत्काळ दुरुस्त करावी याबाबतीत अनेकदा सांगून ही दखल घेतली जात नाही. ४) शहरात योग्य त्या पद्धतीने नालेसफाईचे काम झाले नाही. ते पूर्ण करावे अन्यथा ठेकेदाराला बील अदा करू नये
५) भाजी बाजारात पावसामुळे चिखल, घाण होते. त्यामुळे दुर्गंधी पसरुन, संसर्गजन्य आजाराची शक्यता असते. त्यासाठी तेथे बारीक कच टाकणे, औषधी फवारणे आणि कचरा नियमित उचलून साफसफाई ठेवावी.
६) पावसाळा आणि अन्य प्रासंगिक कारणांमुळे काही लोकोपयोगी कामे असतात. काही वस्तीत पायऱ्या बांधणे, रस्ते दुरूस्ती अशी कामे बांधकाम विभागाने तात्काळ करून देण्याची व्यवस्था करावी.
वरील प्रमाणे नागरी महत्त्वाची मुलभूत कामे सुचवली आहेत. यामध्ये स्वच्छ पाणी पुरवठा हा विषय ज्वलंत आहे. तो खास लक्ष देऊन सोडवावा. दहा पंधरा दिवसांत या कामांची दखल न घेतल्यास जनतेला सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल. लोकांना पाणी न मिळाल्याने काही अप्रिय घटना घडल्यास नगरपालिका प्रशासनावर जबाबदारी राहिल.