मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणूकपूर्व शिवसेनेचा आज ‘वचननामा’ पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर प्रकाशित होणार आहे.
राज्यात पुन्हा सत्तेवर आल्यानंतर शिवसेना काय करणार, यासाठीचा वचननामा पक्षानेने तयार केला असून, वचननामा आज (दि.12) मातोश्रीवर प्रसिध्द होणार आहे. सेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वचननामा प्रसिद्ध करण्यापूर्वीच अनेक आश्वासनांची खैरात केल्याने आता या वचननाम्यात आणखी काय असेल, याविषयी उत्सुकता लागली आहे. दसरा मेळाव्याची संधी घेत उद्धव यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, १० रूपयांत जेवणाची थाळी, ३०० युनिटपर्यंतच्या घरगुती वीज वापराचा दर ३० टक्यांनी कमी करणार, एका रुपयांत आरोग्याची चाचणी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बससेवा यांसारख महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या. त्याविषयी उत्सुकता लागली आहे.