शेतकऱ्यांन तात्काळ नुकसान भरपाई मिळण्यासाठी शिवसेनेचे ‘घेराव आंदोलन’

656c7a07 de42 49a2 87dd c313865b8867

 

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या पिकाचे वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसान भरपाईची मंजूर रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी, यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयात नुकतेच घेराव आंदोलन करण्यात आले.

 

शेतकऱ्यांच्या पिकाचे वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसान भरपाईची मंजूर रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी, यासाठी मंगळवारी तब्बल दोन तास ‘घेराव आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनात वनपरीक्षेत्र अधिकारी ए.आर.बच्छाव, स्टेट बँक मॅनेजर सचिन वानखेडे व पोलिस उपनिरीक्षक निलेश सोळुंके यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेतून झाली. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्याशी संबंधित तांत्रिक अडचणी दूर करून दोन दिवसांनी 150 शेतकऱ्यांना धनादेश देण्यात येतील, असे लेखी आश्वासन वनपरिक्षेत्र अधिकारी ए.आर. बच्छाव यांनी दिले. यानंतर शिवसेनेने आपले घेराव आंदोलन मागे घेतले.

 

या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनिल पाटील , , गणेश टोंगे , राजेंद्र हिवराळे,वसंत भलभले , जाफर अली, शकुर जमदार , पवन सोनवणे, शुभम शर्मा , शुभम तळेले, हरी माळी , अनिकेत भोई, गौरव काळे यांच्यासह असंख्य शिवसैनिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Add Comment

Protected Content