पुणे प्रतिनिधी । राज्यात राष्ट्रवादीला जास्तीत जास्त सत्ता मिळाली असून काँग्रेस असून नसल्यासारखा पक्ष आहे. तर शिवसेना हा संपत चाललेला पक्ष असल्याची घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
येथे चंद्रकांत पाटील म्हणाले की, आत्ता ज्या विधानपरिषद निवडणुका झाल्या त्यात आमची एक सीट जिंकली. इतर पाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आहेत. शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे शिवसेना अस्तित्त्व संपत चाललेला पक्ष आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे
पाटील पुन्हा म्हणाले की, सत्ता असा हा एक फेविकॉल आहे तो चिकटून बसतो. विविध प्रकारचे अपमान सहन करायला लावतो. राष्ट्रवादी खूप महत्त्व घेते आहे. काँग्रेस असून नसल्यासारखा पक्ष आहे आणि शिवसेनेचं अस्तित्त्व संपत चाललं आहे असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला टोला मारला. तर, पहिल्यांदाच सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे पुढे काय ते पहावं लागेल असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.