शिवसेनेचे केंद्रीय अरविंद सावंत यांनी दिला राजीनामा

arvind savant

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | शिवसेनेचे केंद्र सरकारमध्ये असलेले एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी आज (दि.११) आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान मोदी यांच्याकडे सोपवला आहे. ते केंद्रात अवजड उद्योग विभागाचे मंत्री होते.

 

त्यांच्या राजीनाम्यासोबतच त्यांनी भाजपा-शिवसेनेची सुमारे ३० वर्षे जुनी असलेली युती संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने एन.डी.ए.तून बाहेर पडणे आता निश्चित झाले आहे. त्याच बरोबर शिवसेना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून राज्यात सरकार बनवणार असल्याचेही जवळपास स्पष्ट झाले आहे.

Protected Content