शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मशाल चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आम्ही तयार केलेला मशाल हे निवडणूक चिन्ह आपण निवडणूक आयोगाला दिले आहे. धनुष्यबाण हे चिन्ह देखील आपण तयार करुनच निवडणूक आयोगाला दिले होते. आयोगाने त्यालाच मान्यता दिली होती. त्याच प्रमाणे अधिकृत मशालीचे चिन्ह आम्हाला देण्यात यावे, अशी मागणी देखील निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसेच मशाल चिन्हा प्रमाणे दिसणारे इतर कोणतेही चिन्ह मतपत्रिकेत ठेवू नये, असेल तर ते हटवण्यात यावे, अशी विनंती देखील निवडणूक आयोगाला केली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत आपण मशाल या चिन्हावरच लढणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. धनुष्यबाणाचा चिन्ह हे आपण निवडणूक आयोगाला तयार करून दिला होते. त्याच चिन्हाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली होती. त्यानुसार आता आपण मशाल चिन्ह देखील तयार करून निवडणूक आयोगाला दिले आहे. ते चिन्ह मान्य करून देण्याची मागणी आपण निवडणूक आयोगाला केली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे मशाल या निवडणूक चिन्हावरच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केला आहे.

या संदर्भातला निकाल देखील येत्या ६०- ६५ वर्षात लागेल असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर देखील खोचक टीका केली. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आमदार अपात्रता प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे प्रलंबित आहे. तर या प्रकरणाचा निकाल निवडणूक आयोगाकडे देखील प्रलंबित आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला टोला लगावला आहे.

Protected Content