मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेने गृहमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ नये, नाहीतर मातोश्रीवर कॅमेरे लागतील, असा खोचक सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिला आहे.
शिवसेनेकडे असलेले गृहमंत्रिपद मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. याबाबत महाविकास आघाडीत एकमत झाल्याचीही माहिती समोर आली आहे. सेनेच्या या निर्णयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सल्ला देऊ केला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, अर्थखातं, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आता गृहखातं पण शिवसेनेने दिलं, मग यांनी स्वत:कडे ठेवलं काय फक्त मुख्यमंत्रिपद?, असा खोचक सवाल देखील चंद्रकात पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच सरकारने शेतकऱ्यांना दिलेली दोन लाखांची कर्जमाफी स्वागतार्ह आहे. मात्र ही शुद्ध फसवणूक आहे अशी टीका पाटील यांनी केली होती. “सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेली दोन लाखाची कर्जमाफी ही फसवणूक आहे. उद्धव ठाकरे यांनी जो शब्द दिला होता तो पाळला नाही. त्यांनी दिलेल्या शब्दावरुन यु-टर्न मारला आहे, असेही श्री.पाटील म्हणाले होते