जामनेर विधानसभा मतदारसंघाची शिवसेना आढावा बैठक संपन्न

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  प्रतिनिधी |  शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांच्या आगामी जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जामनेर विधानसभा मतदारसंघाची शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या आढावा बैठकीचे बोहरा सेंट्रल स्कूल सभागृहात आयोजन करण्यात आले.  ही बैठक रावेर लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुख विलास पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पडली.

 

विलास पारकर यांनी आढावा बैठकीत सांगितले की,  रावेर लोकसभा मतदारसंघात तीन व चार नोव्हेंबर रोजी चोपडा व मुक्ताईनगर येथे शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली महाप्रबोधन यात्रा येणार आहे. तसेच बंडखोरांच्या मतदार संघात जाहीर सभेतून आपले विचार मांडणार आहेत.  या महाप्रबोधन यात्रेसाठी तीन व चार नोव्हेंबर रोजी होणाऱ्या चोपडा व मुक्ताईनगर येथे सुषमा अंधारे यांच्या जाहीर सभेला जामनेर विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले. या बैठकीत सुरुवातीला सहसंपर्कप्रमुख डॉ. मनोहर पाटील, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत आदींनी मनोगत व्यक्त केले.  सुत्रसंचालन युवासेना उपजिल्हाधिकारी विश्वजित पाटील आणि प्रास्ताविक विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख श्रीकांत पाटील यांनी केले तर आभार तालुका प्रसिध्दी प्रमुख गणेश पांढरे यांनी मानले.

याप्रसंगी रावेर तालुका संपर्कप्रमुख मोहन मसुरकर,विधानसभा क्षेत्र प्रमुख नीलकंठ पाटील, जिल्हा उपसंघटक सांडू गुरव,जामनेर शहरप्रमुख अतुल सोनवणे, ज्ञानेश्वर जंजाळ, शेंदुर्णी शहरप्रमुख भैय्या गुजर, तालुका संघटक विष्णु सोनवणे, उपतालुकाप्रमुख- अशोक जाधव, अरुण पाटील, कृष्णा चोरमारे, युवासेना तालुका अधिकारी विशाल लामखेडे,मयूर पाटील,मीना शिंदे,सुधाकर शेठ सराफ,नागेश्वर पाटील,मोहन जोशी यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content