Home Cities भुसावळ चित्रपटामुळे भावना दुखावल्याने भुसावळात शिवसेनेतर्फे निषेध

चित्रपटामुळे भावना दुखावल्याने भुसावळात शिवसेनेतर्फे निषेध


भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नुकताच प्रदर्शित झालेल्या “बॉर्डर 2” चित्रपटात सनी देओल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा संदर्भ अत्यंत अनादरासह घेतल्याची चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या भावना या चित्रपटामुळे दुखावल्या असल्याने भुसावळ विभागातील शिवसेना कार्यकर्त्यांनी यावर त्रिवार निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

भुसावळातील शिवसेना विभाग प्रमुख अवि भगत यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि महिला आघाडी योजनेनुसार दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी मामाजी टॉकीजजवळ त्रिवार निषेध करण्यात येणार आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जाहीरपणे आदरयुक्त पद्धतीने घेतले गेले पाहिजे, तसेच सनी देओल यांनी मराठा समाजापुढे माफी मागावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

निषेधासाठी पत्रकाद्वारे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख मा. एकनाथ शिंदे, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील आणि आमदार मा. चंद्रकांत पाटील यांचे आशीर्वाद घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन केले.


Protected Content

Play sound