यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज रविवारी २५ जुलै रोजी दुपारी २ वाजता शिवसेना शिवसंपर्क अभियान राबाविण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी माजी आमदार प्रा. चंद्रकात सोनवणे यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
आज रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या बैठकीला किनगाव-डांभूर्णी आणि साकळी-दहीगाव जिल्हा परिषद गटातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना शिवसंपर्क अभियान मोहीम अंतर्गत “घर तिथे शिवसैनिक व गाव तिथे शाखा” हे अभीयान माजी आमदार तथा चोपडा-रावेर लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख प्रा. चंद्रकांत सोनवणे आणि त्यांचया पत्नी आमदार लताताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणार आहे.
सदर बैठकीस माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा यावल कृषी उत्पन्न बाजार सामितीचे सभापती तुषार पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख गोटु सोनवणे, यावल पं.स. माजी उपसभापती व शिवसेना आदीवासी सेनेचे तालुकाप्रमुख भारसिंग बारेला, लिलाधर पाटील, योगेश पाटील, रोहीदास महाजन, किशोर माळी, आडगावचे सरपंच रशीद तडवी, सुर्यभान पाटील, लक्ष्मण बडगुज यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते व पदधिकारी उपस्थित होते. शिवसेना पक्ष संघटना बांधणी व आदी विविध विषयांवर माजी आमदार व प्रा .चंद्रकांत सोनवणे यांनी मार्गदर्शन करण्यात आले.