जळगावात रेमडेसिवीरचा काळाबाजार : टोळक्याची चौकशी

जळगाव प्रतिनिधी । भुसावळच्या पाठोपाठ जळगावातही रेमडेसिवीर इंजेक्शन वाढीव किंमतीत विकले जात असल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी या संदर्भात काही तरूणांची कसून चौकशी सुरू केल्याचे वृत्त आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळातच कालच ओम पॅथॉलॉजी लॅबमध्ये रेमडेसिवीरचे पाच इंजेक्शन्स जप्त करण्यात आले होते. या इंजेक्शनची वाढीव दराने विक्री करण्यात येत असल्याने पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. यानंतर याच प्रमाणे हा प्रकार जळगावात देखील होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार आज दिवसभर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत काही तरूणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या संदर्भात अजून पोलीस प्रशासनाने अधिकृती माहिती जाहीर केली नसली तरी सुमारे १० जणांची चौकशी सुरू असल्याच्या माहितीला दुजोरा देण्यात आला आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.