अस्वस्थ वाटू लागल्याने शिवसेना नेते संजय राऊत लिलावती रुग्णालयात

sanjay raut

 

मुंबई (वृत्तसंस्था) अस्वस्थ वाटू लागल्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांना अचानक लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून छातीत वेदना होत होत्या. त्यामुळे आज दुपारी त्यांना अचानक लिलावती रुग्णालयात दाखल व्हावे, लागले. राऊत यांना दोन दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला असल्याचे कळते. पुढचे दोन दिवस संजय राऊत कुणालाही भेटणार नाहीत असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. संजय राऊत निवडणूक निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवसापासून चर्चेत आहेत. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांना छातीत वेदना होत होत्या. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळते.

Protected Content