जिल्ह्यात शेतकरी मदत केंद्र सुरु करणार – वाघ (व्हिडीओ)

gulabrao vagh press

जळगाव, प्रतिनिधी | सध्या राज्यातील शेतकरी ओल्या दुष्काळाने त्रस्त झालेला आहे. राज्यात सध्या राजकारणाचे डावपेच आखले जात आहेत. त्याचवेळी निसर्गाने मार दिलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी जिल्ह्यात मदतकेंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती आज (दि.११) शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी संघटनेच्या जिल्हा बैठकीत दिली.

 

यावेळी ते म्हणाले की, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत पिक विम्याची मदत, पंतप्रधान विमा योजनेची मदत व अन्य मदत मिळण्यासाठी या मदत केंद्राद्वारे शिवसैनिक प्रयत्न करणार आहेत. तसे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत. सोशल मिडियाचे महत्व सांगताना वाघ यांनी शिवसेनेला लाभ होईल, शिवसेना पक्ष वाढीसाठी फायदा होईल, अशा पोस्ट आवर्जून फॉरवर्ड करा, असा सल्लाही दिला.

 

 

Protected Content