राऊतांमुळेच शिवसेना अडचणीत : चंद्रकांत पाटलांचा टोला

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार संजय राऊत यांच्यामुळेच आज शिवसेना अडचणीत आल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर फडणवीस हे दिल्लीत मिठाई वाटण्यासाठी गेल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

 

शिवसेनेतील घडामोडीवर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एबीपी-माझा या वाहिनीशी बोलतांना खोचक भाष्य केले आहे. ते म्हणाले की, संजय राऊतांच्या महान नेतेगिरीमुळेच शिवसेना अडचणीत आली आहे. त्यावर ते सामनामध्ये अग्रलेख लिहीतील की तुम्हाला का आमची चिंता करण्याची गरज नाही. पण एकत्र काम केल्याने आम्हाला शिवसेनेबद्दल प्रेम आहे. त्यामुळे आमचे म्हणणे आहे की संजय राऊत शिवसेनेचे भयंकर नुकसान करत आहेत. ते काम त्यांना कोणी तरी दिले आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी   म्हटले आहे.

 

चंद्रकांत पाटील पुढे म्हणालेत की, आम्ही राजकीय पक्ष आहोत भजनमंडळी नाही. आमचं काम राजकारणाच्या माध्यमातून सत्तेवर येणे, लोकांची सेवा करणे आहे. सत्तेसाठी प्रस्ताव आल्यावर कोण नाही बोलणार, असे   चंद्रकांत पाटील म्हणालेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!