मुक्ताईनगर प्रतिनिधी । वैद्यकीय सेवा बजावून कोरोना सारख्या अनेक जीवघेण्या महामारीतून वाचविण्यासाठी रुग्णांना सेवा देणारे तसेच अपघात ग्रस्तांना वेळेवर उपचार करून जीवदान देणारे डॉक्टर्स हेच खऱ्या अर्थाने देवदूत आहेत. या भावनेतून शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी दि. 1 जुलै रोजी डॉक्टर्स डे निमित्त शिवसेनेच्या वतीने शहरातील सर्व डॉक्टरांचा सत्कार भगवी शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, शहर प्रमुख गणेश टोंगे , राजेंद्र हिवराळे, अल्पसंख्याक सेनेचे जिल्हा संघटक अफसर खान, युवासेना तालुका प्रमुख पंकज राणे, नगरसेवक संतोष (बबलू) कोळी , पियुष मोरे , संतोष मराठे, आरिफ आझाद, नुरमोहम्मद खान यांचेसह संतोष माळी, पप्पू मराठे, बबलू वंजारी , आकाश सापधरे, कैलास बावणे आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.