मुंबई (वृत्तसंस्था) सत्तास्थापना करण्यासाठी इतर पक्षांशी प्राथमिक बोलणी करून काही तात्विक चर्चा करण्यासाठी किमान दोन दिवसांचा वेळ गरजेचा असल्याचे शिवसेनेचे म्हणणे होते. परंतू वेळ वाढवून इंयात राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला होता. नेमकं याबाबतच शिवसेनेकडून कायदेशीर पर्यायांची चाचपणी सुरु असून न्यायालयातही जाण्याचीही चर्चा सुरु आहे.
राज्यपालांशी राजभवनावर चर्चा केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सांगितले होते की, आम्हाला काल सायंकाळी राज्यपालांकडून सत्तास्थापनेसाठी आमंत्रण मिळाले. सत्तास्थापना करण्यासाठी आम्ही दावा केला आहे. इतर जे दोन पक्ष आहेत त्यांच्याशी प्राथमिक बोलणी करून काही तात्विक चर्चा करण्यासाठी आम्हाला किमान दोन दिवसांचा वेळ गरजेचा आहे. यासाठी आम्ही राज्यपाल महोदयांकडे वेळ मागितला होता, मात्र त्यांनी तो वेळ नाकारला. आमची वेळ साडेसात वाजेपर्यंत असल्यामुळे आम्ही पावणेसात वाजता इथे पोहोचलो. आम्ही राज्यपालांना भेटून सांगितले की सत्तास्थापना करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र राज्यपालांनी आमची वेळ नाकारली असली तरी त्यांनी आमचा दावा नाकारलेला नाही. नेमक हाच मुद्दा घेऊन शिवसेना न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.