शिवसेनेने कोल्हापूरात कन्नड सिनेमाचे शो पाडले बंद

shivsena 1

कोल्हापूर, वृत्तसंस्था | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला असून सांगली, कोल्हापूरमध्ये याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. सीमावासियांवरील अन्यायाच्या विरोधात शिवसेनेतर्फे कोल्हापुरात आज निषेध फेरी काढण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मंडळी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या कर्नाटक नवनिर्माण सेना व कन्नड रक्षक वेदिकेचा त्यांनी निषेध केला.

 

मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील दाभोळकर चौक इथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुराप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहनही केले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील एका थिएटरमधील कन्नड सिनेमाचे शो बंद पाडले. कोल्हापूर एसटी आगारातून कर्नाटकात जाणाऱ्या बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी भाषिकांच्या हक्कासाठी संघर्ष सुरू असतानाच कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर जावून गोळ्या घाला, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतर मराठी भाषिक आणि शिवसेना आक्रमक झाली.

Protected Content