भुसावळ, प्रतिनिधी | पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ सानेगुरुजी यांची आज (दि.२४) १२० वी जयंती आहे. त्यांच्या येथील बाजारपेठ पोलीस स्टेशन समोर असलेल्या स्मारकाची अवस्था मात्र अत्यंत दयनीय झालेली आहे. त्यामुळे शिवसेनेतर्फे आज या स्मारकाची साफसफाई करण्यात आली.
भुसावळ शिवसेना शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, विभाग प्रमुख निखिल बऱ्हाटे, उपविभाग प्रमुख सचिन चौधरी, शाखा प्रमुख अथर्व जोशी, हर्षल चौधरी, मनीष महाजन, अंकुश झांबरे, जयेश भंगाळे, मयूर ढाके, योगेश जैन, विशाल लोखंडे, नेहाल बोरोले यांनी स्मारकाची साफसफाई करीत माल्यार्पण केले. हे स्मारक गवतांनी वेढले असून फरशा उचकटलेल्या आहेत. रेल्वे प्रवासी स्मारकावर पाय देऊन चढ-उतर करतात.
महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीला तरी किमान त्यांच्या स्मारकांची स्वच्छता करण्याचा पायंडासुद्धा नगरपालिका प्रशासनाने सोडून दिला आहे. स्मारकांसाठी आलेला कोटयवधी रुपयांचा निधी नगरपालिकेत पडून आहे. असा आरोप शिवसेनेने केला असून ही परिस्थिती बदलली नाहीतर शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वात आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना व सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे.